Mumbai News Updates: मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध पती-पत्नीने दीर्घ आजारपणास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात 76 वर्षीय पत्नी सविता सुर्वे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे 77 वर्षीय पती दत्ताराम सुर्वे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. हा प्रकार त्यावेळी उघडकीस आला जेव्हा त्यांचा मुलगा आज सकाळी त्यांना नाश्ता देण्यासाठी गेला. सकाळी मुलगा नाश्ता देण्यासाठी गेल्यानंतर दोघेही दार उघडत नव्हते, त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला, तेव्हा दोघेही बेडवर झोपले असल्याचे दिसून आले आणि काही उत्तरही देत नव्हते.
बोरिवली पूर्व मुंबई येथे राहणारं हे वृद्ध जोडपं आजारपणाला कंटाळून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामध्ये सविता दत्ताराम सुर्वे यांचा मृत्यू झाला आहे. सविता सुर्वे यांना मागील पंधरा-वीस वर्षापासून डायबेटिसचा आजार होता. तसेच त्यांना डोळ्यांना दिसत नव्हते त्या अंथरुणावर खिळून होत्या. सोबतच त्यांचे पती दत्ताराम सुर्वे यांना मागील 25 वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती.
तसेच त्यांचे हार्टचे काउंट कमी असल्यामुळे पेस मेकर बसवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा हात आणि छातीत खूप दुखत असे. तसेच 2020 मध्ये त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. आज सकाळी 06.15 वा. त्यांचा मुलगा सचिन सुर्वे नेहमी प्रमाणे आई-वडिलांना नाश्ता देण्यासाठी गेले असता त्यांचे वडील दरवाजा उघडत नव्हते. म्हणून त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांचे आई-वडील बेडवर झोपलेल्या स्थितीत होते. दत्ताराम सुर्वे 77 वर्ष हे अस्पष्ट बोलत होते. त्यांना उपचारसाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दरम्यान सविता सुर्वे यांचा मात्र मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सचिन सुर्वे यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचे आईवडील रत्नाकर सी एच एस, टाटा पॉवर, बोरिवली पूर्व,मुंबई येथेच दुसऱ्या मजल्यावर राहायला आहे. सकाळच्या वेळी ते नेहमी प्रमाणे आई-वडिलांना नाश्ता देण्यासाठी गेले होते. यावेळी त्या दोघांनी दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रूमचा दरवाजा उघडला असता त्यांचे आई- वडील बेडवर झोपलेल्या स्थितीत होते आणि शरीर पूर्ण ताठरलेले होते. यावेळी वडील दत्ताराम हे शुद्धीत होते, असं सचिन यांनी सांगितलं. यानंतर त्या दोघांनाही उपचारसाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दरम्यान सविता सुर्वे यांचा मात्र मृत्यू झाला.
ही बातमी देखील वाचा