मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईकांशी  (Pratap Sarnaik) संबंधित एनएसईएल प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणेनं (ED)दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय समजले जातात. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती. बुधवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांनी आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात यावर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती, मात्र पुढे पीएमएलए कोर्टानं त्यांची जामीनावर सुटका केली होती. हाच जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं जे फेटाळण्यात आलंय.


किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारची 'महान इलेव्हन' घोषित, सोमय्यांच्या निशाण्यावर अकरा नेते, काय केलेत आरोप- वाचा 


काय आहे प्रकरण -


सुमारे 5,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. देशमुख हे प्रताप सरनाईक यांचे निटकवर्तीय असल्याचे सांगत ईडी आता त्यांच्या मागावर असल्याचा दावा भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी समाज माध्यमावरून केला होता. 'आस्था ग्रुप' या काळ्या यादीतील कंपनीसोबत एनएसईएलमध्ये 250 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपवर ठेवण्यात आला आहे. विहंग आणि आस्था ग्रुप यांना संयक्त विद्यमाने विहंग हाऊंसिग प्रोजेक्ट नावाने प्रकल्प सुरू केला. आणि त्यातंर्गत विकासक योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी केल्या. त्यातील काही जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. सुरूवातीला 22 कोटींची फसवणूक समोर आली. त्यात एक कोटी शेतकऱ्याला देण्यात आले. त्यात सरनाईक यांनी 12 तर उर्वरीत 10 कोटी देशमुख यांच्या खात्यात वळविण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. 



साल 2014 मध्ये ईडीने टिटवाळ्यातील हा भूखंड जप्त करून प्राधिकरणाकडून भूखंड जप्तीची पुष्टी केली होती. तसेच या जागेचा कोणताही व्यवहार होऊ नये, म्हणून ईडीने स्थानिक महसूल प्राधिकरणास जप्तीबाबत माहिती दिली होती. मात्र, जानेवारी महिन्यात सरनाईक यांच्या मदतीने विकासक योगेश देशमुख यांनी ईडीनं जप्त केलेला भूंखड व्रिकीसाठी काढल्याची बाब निदर्शानास आली आणि ईडीने याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली. यापूर्वी ईडीनं बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती.