मुंबई : मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्‍याने मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या गळती दुरुस्तीचे काम  शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 ते शनिवार, दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 


मालाड पश्चिमस्थित लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्‍याचे निदर्शनास आले आहे. गळती दुरुस्तीची कार्यवाही शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रात्री 10.30 वाजता हाती घेण्यात  येत आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे कामकाज शनिवार, दिनांक  25 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव  पश्चिम येथील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, दिनांक 25  जानेवारी 2025 रोजी बंद राहणार आहे. 


Mumbai Water Supply News : या विभागात पाणीपुरवठा बंद  


1) मालाड पश्चिम  - अंबुजवाडी, आजमी नगर ,जनकल्याण नगर 
2) गोरेगाव पश्चिम - उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग 


संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. 


ही बातमी वाचा: