मुंबई : दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका 78 वर्षींय वृद्ध महिलेवर एका 20 वर्षांच्या युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलं. या वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार असून त्याचा फायदा घेत या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. 


पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर 20 वर्षांचा आरोपी प्रकाश मोरियाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


वृद्ध महिला घरी एकटीच होती


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला ही घरात एकटीच होती. या महिलेला डिमेंशिया आणि मेमरी लॉसचा आजार आहे. त्यामुळे तिच्या घरी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. महिलेला एकटी असल्याचं पाहून आरोपी घरात शिरला. त्यावेळी महिला तिच्या रुममध्ये झोपली होती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.


सीसीटीव्हीमुळे घडलेला प्रकार उघडकीस 


घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली.  या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपीच्या शोधात पोलिसांची टीम रवानगी करण्याात आली. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिकचा तपास दिंडोशी पोलिस करत आहेत. 


ही बातमी वाचा: