मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 पैकी 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आज दुपारी ही सोडत जारी झाली.

शिवसेनेच्या प्रणीता वाघधरे यांचा प्रभाग नव्या वॉर्डरचनेनुसार अनुसूचित जातीसाठी राखीव

शिवसेनेच्या संजना मुणगेकर यांचा प्रभाग एससीसाठी राखीव
संजना मुणगेकर जूना प्रभाग १६० तर नवा १६९

महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वॉर्डचे तीन तुकडे
१९५, १९८ आणि १९९ या नव्या प्रभागात महापौरांचा जुना (१९४) प्रभाग विभागला गेला
यातील १९५ आणि १९८ एससीसाठी राखीव, तर महापौर एससीमध्ये मोडतात
महापौर १९५ किंवा १९८ मधून लढू शकतात

काँग्रेसच्या सुनिल मोरे यांचा प्रभाग एससी महिलांसाठी राखीव. जुना प्रभाग १९५ तर नवा २००

काँग्रेसच्या मनोज जामसुदकर यांचा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित
जामसुदकर यांचा जुना प्रभाग २०८ तर नवा २१०

शिवसेनेचे गणेश सानप यांचा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित
सानप हे फोर्ट, कुलाबा येथील नगरसेवक. जुना प्रभाग २२४, नवा २२५

शिवसेनेचे जितेंद्र वळवी यांचा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित

वळवी गोरेगावच्या आरे कॉलनीचे नगरसेवक. जुना प्रभाग ४७, नवा ५३

स्थायी समिती सदस्य यशोधर फणसेंच्या वॉर्डचेही चार तुकडे
५०% मतदारसंघ हा ५९ क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये गेला
यशोधर फणसेंच्या मतदारसंघातील मोठ्या भागावर एसटी महिलांसाठी आरक्षित

उपमहापौर अलका केरकर (भाजप) यांचा नवा प्रभाग (९९) एसटीसाठी आरक्षित.
जुना प्रभाग (93) भाजपचा परंपरागत वॉर्ड मानला जातो.

मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांना मोठा धक्का. नव्या वॉर्ड रचनेनुसार १९१ हा वॉर्ड खुला गट महिलांसाठी आरक्षित

शिवसेनेच्या राजुल पटेल यांचा मतदारसंघ असलेला ६५ क्रमांकाचा प्रभाग खुल्या प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित

शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकरांनाही मोठा धक्का. त्यांचा मतदारसंघ असलेला १ क्रमांकाचा प्रभाग खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांचाही मतदारसंघ फुटला. प्रभाग ११७, १११ मध्ये विभागला गेला. ११७ ओबीसी महिला, १११ खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित

संबंधित बातम्या :


बीएमसीमध्ये अनुसूचित जातींसाठी यंदा 15 वॉर्ड आरक्षित