वडील ओरडल्यामुळे दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 05:15 PM (IST)
कल्याण : अंबरनाथमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याच्या रागातून विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं. दहावीत शिकणारी सानिया रात्री उशिरा गरबा खेळून आली होती. त्यावेळी सानियाच्या वडिलांनी 'तू दहावीत आहेस, तुझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, अभ्यास कर' असं सांगितलं. या गोष्टीचा राग आल्याने सानियाने राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. यात सानियाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सानियाच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. अंबरनाथ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.