Mohit kamboj : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीचे (ED) धाड सत्र सुरू असताना, आता शिवसेनेने (Shiv Sena) ही याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आज बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) प्रकरणी भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना बीएमसीने पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. 


मोहित कंबोज यांना घराच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत नोटीसीचे उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटीसमधून पालिका प्रशासनाने दिला आहे.  मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 अंतर्गत 351 ‌अ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेकडून झालेल्या पहाणीनुसार मंजुर करण्यात आलेल्या आराखड्यात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत, असे नोटीस मध्ये सांगितले आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृतपणे   ॲाफिससाठी खोली आणि सिक्युरिटी  केबीन बांधकाम करण्यात आली आहे. लिफ्टच्या समोर लायब्ररीचे बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या अंतर्गत पार्किंगमध्ये काचालाऊन कॅामन स्टींग डायनिंग एरिया बनवण्यात आला आहे. यावर येत्या आठवड्याभरात मोहीत कंबोज यांना उत्तर द्यावे लागेल. 


भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत कायदेशीर उत्तर देणार असल्याचे सांगितलं आहे. 






बेकायदेशरी बांधकामावर चालणार हातोडा? 


मागील काही दिवसांपासून मोहित कंबोज आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. कंबोज यांनी महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीवर टीका करणारे कंबोज हे आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कंबोज यांच्या घरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांना या संबधित नोटीस देण्यात आली होती. मोहित कंबोज घरासोबतच त्यांच्या कार्यालयात झालेल्या अनधिकृत बांधकामांशी संबधित नोटीस ही आज त्यांना पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोहित कंबोज यांना फटका बसू शकतो. एमआरडीपी या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आहे. त्यांनी आपल्या घरात आणि कार्यालयाच्या बांधकामात काही बदल केली असल्यास ही कारवाई करण्यात येणार आहे.