मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. मुंबई महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या वॉर्ड आरक्षण प्रक्रियेला येत्या 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.


 
3 ऑक्टोबरला मागासवर्ग आणि महिला आरक्षण प्रवर्गाची सोडत (लॉटरी) निघणार. म्हणजेच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे वॉर्ड आरक्षणाचे चित्र तीन तारखेला स्पष्ट होणार आहे.

सुरुवातीला 9 सप्टेंबर रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे प्रभाग जनसंख्येच्या आधारावर निश्चित केले जातील. निश्चित केलेले हे वॉर्ड लॉटरीत समाविष्ट असणार नाहीत.

 
वॉर्ड आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक

9 सप्टेंबर-- प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींकरता आरक्षित प्रभागांसह तयार होईल (22 वॉर्ड)

16 स्प्टेंबर--अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींकरता आरक्षित प्रभागांसह तयार झालेला प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तपासणी करुन राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल. यावर महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकण विभाग, तसंच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांची समिती काम करेल

 
23 स्पटेंबर-- प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील.

3 ऑक्टोबर-- नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षणासाठी सोडत काढणे

5 ऑक्टोबर-- प्रारुप प्रभागरचनेची सोडतीनंतरची अधिसूचना जाहीर होईल. (याबाबतचा अध्यादेश काढला जाईल.)

5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर-- प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी

5 नोव्हेंबर-- प्रारुप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या  हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयुक्त सुनावणी करतील...

11 नोव्हेंबर-- प्रारुप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयुक्तांनी सुनावणीदरम्यान केलेल्या शिफारसी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होतील.

 
18 नोव्हेंबर-- प्रारुप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयुक्त विचार करुन अंतीम निर्णय देतील

22 नोव्हेंबर-- सुनावणीदरम्यान झालेल्या निर्णयानुसार प्रभागरचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करुन प्रभाग रचनेच्या अंतीम अध्यादेश काढला जाईल