मुंबई : तुम्ही जर एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देत असाल तर सावधान. कारण तुम्हाला या सवईचा मोठा फटका बसू शकतो.
ATM मध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर कोपऱ्यातील कचऱ्याच्या डब्ब्यात पैसे काढलेल्या स्लिप पडलेल्या दिसतात. आपण पैसे काढून फेकून दिलेल्या स्लिपचा कोणीही गैरवापर करणार नाही, अशी आपली धारणा असते. मात्र ही धारणा आपला घात करु शकतो.
हॅकर्सचं टार्गेट
फेकून दिलेल्या एटीएम स्लिपवरील माहिती डिकोड करुन हॅकर्स तुमच्या अकाऊंटवर डल्ला मारु शकतात. अर्थात हे तितकं सोपं नसलं, तरीही काळजी घेणं कधीही चांगलं.
सायबर क्रिमिनल्स आपल्या अकाऊंटवर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या बँक अकाऊंटमधील शिल्लक तपासत राहणे गरजेचे आहे. तसंच एटीएममधून पैसे काढल्यावर त्याची स्लीपही जपून ठेवणे आवश्यक आहे.
जर बँकेने आपल्या खात्यातील माहिती अपडेट केली नसेल, तर या स्लीपच्या माध्यमातून ती अपडेट करून घेता येईल. एटीएम हे एक यंत्र असल्याने त्यात काही दोष असू शकतात, अशावेळी या स्लीप आपल्याकडे पुरावा म्हणून राहतील.