मुंबई : मुंबईत कचरा उचलणाऱ्या गाड्यांवरील सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे. प्रशासनासोबत कामगार नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मुंबईतील 24 वॉर्ड मधील सफाई कर्मचाऱ्यांनी संप केल्याने मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती.
सध्या फक्त फक्त चार वॉर्ड मध्ये कचरा उचलणे आणि वाहून नेण्याचं काम खासगी कंपनीला दिलं आहे. या सर्व वॉर्डांमध्ये खासगी कंपनीला दिलं नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.
महापालिकेने कचरा उचलण्यासाठी नव्या कंपनीला कंत्राट दिलं आहे. यामुळे कायम आणि कंत्राटवर असलेले सफाई कामगार नाराज आहेत. कारण त्यांची बदली नव्या वॉर्डमध्ये केली जात आहे. महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीच पावलं न उचल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं होतं.
गेल्या दोन दिवसांपासून कांदीवली, बोरिवली आणि दहिसरमधी सफाई कर्मचारी संपावर होते. त्यामुळे सगळ्या 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी झाली होती. प्रशासनाने आज याबाबत निर्णय घेतला नाही तर उद्यापासून बीएमसीचे सर्व विभाग या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा कामगारांनी दिला होता.
मुंबईतील सफाई कर्मचाऱ्याचं कामबंद आंदोलन मागे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2018 09:46 PM (IST)
प्रशासनासोबत कामगार नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मुंबईतील 24 वॉर्ड मधील सफाई कर्मचाऱ्यांनी संप केल्याने मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -