मुंबई : महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) गेल्या तीन दशकांपासून फक्त कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेने (shiv sena) केलं. सांडपाणी निविदा प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्यातील घोळ यापासून नेत्यांना पळ काढता येणार नाही. सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिलाय.


भाजपची कार्यकारिणी आज जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर शेलार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. "आता आमचं ठरलंय, मुंबई महापालिकेत बदल अटळ आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केलाय. 


आशिष शेलार म्हणाले, " गेल्या दोन दशकांपासून मी लढत आहेत. भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील डोक्यातील विकासाचे मुंबईचं चित्र रंगवून, मुंबईकरांना सुपूर्त करायचं आहे. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम, मेट्रो तीन आणि कारशेडमधील अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर   भुर्दंड टाकला जातोय, असा आरोप यावेळी शेलार यांनी केलाय.  


"आता आमचं ठरलंय, मुंबई महानगर पालिकेत बदल अटळ आहे. पालिकेत आमचाच महापौर बसणार. यापुढे आमची तशी मार्गक्रमणा असेल. मुंबईत भाजपचे काम अजून गतीने वाढावीन. गेली दोन दशकं हा संघर्ष आम्ही करत आहोत. जहागीर आमची आहे असे मानून मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली त्याच्या विरोधात लढू. लोकांच्या मनातील चित्र भाजप साकार करेल. भ्रष्ट व्यवस्थेने भरलेल्या उद्धव ठाकरें यांच्या शिवसेनेला तडीपार करू. आमचे टार्गेट आमचा महापौर असेल. राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात, त्यामुळं बाकी निर्णय ते घेतील. पण मुंबई पालिकेत महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केलाय. 


दरम्यान, शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. दादरमध्ये सेनाभवन होत असेल तर भाजपला त्याचा आनंद आहे. 


महत्वाच्या बातम्या


Mumbai BJP : मुंबई भाजपची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे कायम, जाणून घ्या त्यांची कारकीर्द