मुंबई : 'बेस्ट' बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक खुषखबर आहे. बसमधून महिला प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी लेडीज स्पेशल बस सुरु करण्याचा प्रस्ताव बेस्टनं सादर केला आहे.
राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत लेडीज स्पेशल बस सेवा सुरु करण्यासाठी 50 नवीन बसेसची मागणी बेस्टनं केली आहे. या योजनेतंर्गत 50 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. राज्य सरकारनं बेस्टच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास लवकरच मुंबईत महिला प्रवाशांसाठी विशेष बस धावताना दिसतील.
बेस्ट अॅप
बेस्टच्या बस स्टॉपवर मुंबईकरांना ताटकळत राहण्याची गरज नाही. कारण बसच्या आगमनाची अचूक माहिती देणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशनचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु करण्यात आला आहे.
रेल्वेची माहिती देणाऱ्या एम-इंडिकेटरच्या धर्तीवर हे मोबाईल अॅप तयार करण्यात आलं आहे. झोपहॉप नावाच्या कंपनीनं बेस्टसाठी हे तंत्रज्ञान तयार केलं असून 12 बसमध्ये याचा प्रायोगिक तत्त्वार वापर करण्यात येत आहे.
बेस्ट समितीने मान्यता दिल्यास हे तंत्रज्ञान येत्या काळात बेस्टच्या सर्वच बसगाड्यांवर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कुठली बस कुठे आहे ते पाहता येईल.