BREAKING : आमदारांच्या वेतनाढीविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी दाखल केली होती याचिका

मुंबईः प्रस्तावित कोस्टल रोडसाठी नौदलाचं ना हरकत प्रमाणपत्र, कोस्टल रोडवर CCTV, दोन कोस्टल पोलिस स्टेशन असावेत अशी नौदलाची अट

BREAKING : नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा मार्ग मोकळा, प्रकल्पाला विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

हेडलाईन्स:

- पावसामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, रेल्वे तीन ते चार तास उशिरानं 

1. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, जगबुडीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्ग बंद, नांदेडमध्ये रेल्वेरुळ वाहून गेले तर उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीचा इशारा

--------------------------

2. उरणमध्ये 4 संशयित घुसल्यानं दहशत, सर्च ऑपरेशनसाठी एनएसजीचं पथक दाखल, एका संशयितांची रेखाचित्रं जारी

--------------------------

3. उरणमध्ये संशयित शिरल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह नवी मुंबईत हाय अलर्ट, प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

--------------------------

4. इस्लामाबाद शहरावर एफ-16 विमानांच्या घिरट्या, पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांचं ट्विट, नेहमीचा सराव असल्याचं दुसऱ्या एका पत्रकाराचं स्पष्टीकरण

--------------------------

5. भुजबळ-पंकजा भेटीनंतर सामनातून राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र, पकजांपासून पटेल, पवार, तटकरे यांनी काहीतरी शिकण्याचा सल्ला

--------------------------
6. महिला प्रवाशांसाठी विशेष बस चालवण्याचा बेस्टचा मानस, तेजस्विनी योजनेसाठी 50 बस खरेदी करण्याचा प्रस्ताव,

--------------------------

7. ठाणे-शीळ दरम्यानच्या ट्रॅफिक जामचा आरोग्यमंत्र्यांनाही फटका, दीपक सावंतांवर पायपीट करण्याची नामुष्की, वर्सोवा पूल बंद झाल्यानं वाहतूक कोंडी

--------------------------

8. दोन दिवसांच्या संततधारेमुळं मुंबईसह उपनगरांच्या वेगावर ब्रेक, वसई-विरारमधून 400 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, जोरदार पावसानंतर काहीशी उसंत

--------------------------

9. कानपूरच्या खेळपट्टीवर टीम इंडिया सापडली किवींच्या जाळ्यात, उपहाराच्या एक बाद 105 अशा भक्कम स्थितीतून भारताची नऊ बाद 291 अशी घसरगुंडी

--------------------------

10. पावणे चार कोटीच्या लँबोर्गिनीचं भारतात लाँचिंग, जगभरात फक्त अडीचशे मॉडेल, 3 सेकंदात 100 किमी वेगानं पळणारी ललना