मुंबईत मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, चांदिवली या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तर कुर्ला, अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिरानं सुरु आहे.
शुक्रवारी पवई तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यात आज दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे पवई तलावाजवळच्या रस्त्यावर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पवई तलावाजवळ, अंधेरी, चकाला, जेव्हीएलआर, हिंदमाता भागात रस्त्यावर पाणी साचलं आहे.
पावसाचा परिणाम सकाळ-सकाळी रेल्वे वाहतुकीवर झाल्याचं दिसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरु आहे.