मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे फेब्रुवारीपासून पुढील तीन महिने डागडुजीसाठी रोज 8 तास बंद राहणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवेची डागडुजी चालणार आहे. मुंबई विमानतळ देशातील सर्वात व्यस्त असणारं दुसरं विमानतळ आहे. या विमानतळावरील विमानसेवा 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान 8 तास उशिरानं चालणार आहेत. या दरम्यान विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचा वापर केला जाणार आहे.
मुंबई विमानतळावर दिवसाला 900 विमानं उड्डाण करतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात जवळपास 250 उड्डाणं मुंबई विमानतळावरुन होतात. त्यामुळे डागडूजीच्या काळात या 250 विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होणार आहे.
पाहा व्हिडीओ :