मुंबई: मुंबईत सनबर्न कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र यापूर्वी सुद्धा सनबर्नच्या आयोजकांनी मुंबई महापालिकेचे 10 लाख रुपये थकवल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आली आहे.



खुल्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी एकूण 17 विविध परवानग्या लागतात, आणि 15 दिवस आधीपासून अर्ज करुन त्यासाठी खेटे घालावे लागतात. मात्र, सनबर्नच्या आयोजकांना रातोरात सगळ्या परवानग्या कशा मिळतात यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते आणि वरळी कोळी महोत्सवचे अध्यक्ष अभिजित पाटील माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली होती. यातूनही हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

त्यामुळे चॅरिटीसाठी हा कार्यक्रम करत असल्याचं कारण देत, त्याठिकाणी बार आणि दारूची परवानगी कशाला लागते, असा सवालही पाटील यांनी उपास्थित केला आहे.

येत्या सोमवारी यासंदर्भात MMRDA कडून सनबर्नच्या आयोजकांना कुठल्या आणि कशा परवानग्या दिल्या याबाबत माहितीच्या अधकारांतर्गत पत्र पाठवणार असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा ही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या

मुंबईत सनबर्न फेस्टिव्हल होणारच!

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?


‘सनबर्न’ला आणखी एक दणका, दंडाची रक्कम 1 कोटींवर


सनबर्न फेस्टिव्हलला 62 लाखांचा दंड


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा!


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला ‘सनातन’चा विरोध