हेडलाईन्स


-----------------------

1. पाटणामध्ये गंगा नदीत बोट उलटल्यानं 21 प्रवाशांचा मृत्यू, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं दुर्घटना, अनेकजण बेपत्ता

-----------------------

2. तिरंग्याच्या पायपुसणीनंतर अॅमेझॉनकडून महात्मा गांधींचा अपमान, गांधीजींचा फोटो असलेल्या चपलांच्या ऑनलाईन विक्रीवर सोशल मीडियातून टीका

-----------------------

3. गांधी नोटेवर आल्यापासून रुपयाचं अवमूल्यन, हरियाणाचे कॅबिनेट मंत्री विज यांच्या अकलेचे तारे, सर्व स्तरातील टीकेनंतर सपशेल माघार

-----------------------

4. सांगलीतल्या माळवाडीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, 26 वर्षीय आरोपी प्रशांत सोंगटे ताब्यात

-----------------------

5. नाशिक पुण्यानंतर आता ठाण्यातही भाजपमध्ये गुंडांचा भरणा होण्याची शक्यता, सुधाकर चव्हाण, ओमी कलानी कमळाच्या वाटेवर

-----------------------

6. आघाडीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये बेबनाव, संजय निरूपमांचा आघाडीला विरोध तर राणेंकडून आघाडीचे संकेत

-----------------------

7. करुन दाखवलंनंतर आता शिवसेनेचं डिड यू नो कँपेन, विकासकामांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सची मुंबईत गर्दी, भाजपला चोख उत्तर

-----------------------

8. 14व्या मुंबई मॅरेथॉनला दिमाखात सुरुवात, वातावरणातला गारवा धावपटूंना विक्रमाची प्रेरणा देणारा, धावपटूंचा उत्साह शिगेला

-----------------------

एबीपी माझा वेब टीम