मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रनवे दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहेच. हे रनवे तब्बल सहा तास म्हणजेच आज सकळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असतील. या संदर्भात तीन महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली होती.
मुंबई विमानतळावर दोन रनवे आहेत. 09/ 27 आणि 14/ 32 ही मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्ती-देखभालीच्या कामासाठी बंद असल्याने मुंबई विमानतळावरुन आज कोणतंही विमान उड्डाण घेणार नाही किंवा उतरणार नाही. यामुळे जवळपास 300 विमानांवर याचा परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.
काही विमानं ही संध्याकाळी पाचनंतर उशिराने उड्डाण घेतील तर काही विमानांची उड्डाणं रनवे बंद असल्याने रद्द केली जातील.
या कामाचा दुसरा टप्पा 7 फेब्रुवारी आणि 30 मार्चदरम्यान येणाऱ्या मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी होणार आहे. यादरम्यानही रनवे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. केवळ 21 मार्च रोजी रनवे सुरु असेल.
मुंबई विमानतळाच्या दोन धावपट्ट्या सहा तास बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2018 11:25 AM (IST)
09/ 27 आणि 14/ 32 ही मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्ती-देखभालीच्या कामासाठी बंद असल्याने मुंबई विमानतळावरुन आज कोणतंही विमान उड्डाण घेणार नाही किंवा उतरणार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -