Mumbai kanjurmarg Fire : मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील अपेक्स कंपाऊंडमध्ये असलेल्या सॅमसंगचा सर्विस सेंटरमध्ये लागलेली आग मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 18 ते 20 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. तब्बल साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.  


सध्या सर्विस सेंटरमध्ये फायर कूलिंगचे काम सुरू आहे.  सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सॅमसंग कंपनीचं मोठ्याप्रमाणात सामान जळून खाक झालं आहे. तर बाजूला असलेलं सफोला तेलाचं गोडाऊनसुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाला आहे.


पोलिसांच्या माहितीप्रमाणे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. सध्या आगीच्या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस करत आहेत. दरम्यान स्थानिक शिवसेना नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांनी देखील या घटनेची माहिती घेत संबंधीत सूचना केल्यात. 


दरम्यान सॅमसंगचा सर्विस सेंटरमधून या आगीला सुरुवात झाली. या  ठिकाणी इलेक्ट्रॉनिकस वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदाम आहेत. डबावाला कंपाऊंडजवळ ही आग लागली होती. तर आजूबाजूच्या गोदामामध्ये सिलेंडर असल्यामुळे जोरात सिलेंडरचा स्फोट देखील होत होते. पण अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेळेच यावर नियंत्रण मिळवता आलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटर आणि सफोला तेलाच्या गोदामाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



 


संबंधीत बातम्या 


मुंबई: मानखुर्दमधील भंगाराच्या गोदामांना आग; कोणतीही जीवितहानी नाही


Fire Bike : आग विझवण्यासाठी मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक


सतत लागणाऱ्या आगींबद्दल अग्निशमन दलाचे माजी अधिकारी प्रताप करगुप्तीकर यांचे मत