मुंबई:  मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी (Mumbai News)  मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन (Bullet Train)  प्रकल्पालाही काम बंद नोटीस बजावण्यात आली आहे. बीकेसी (BKC)  इथल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी (Air Pollution) महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे पालन होत नसल्याने काम बंद नोटीस देण्यात आली आहे. तसंच बुलेट प्रकल्पाच्या बाजूलाच असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या रेडिमिक्समधून होणारे प्रदूषण पाहता या प्लांटलाही 'काम बंद'ची नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जात नसल्याने या ठिकाणी काम बंद नोटीस देण्यात आली.


प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आलीय.   मुंबईत  प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन  योग्य रीतीने होत नसल्याने मुंबईतील मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन काम करणाऱ्या कंत्राटदाराला बीएमसीकडून काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.  


हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल


मुंबई प्रदुषीत (Pollution) करणाऱ्या सरकारी प्रकल्पांची आधी पाहणी करा, असं म्हणत हवेच्या गुणवत्तेवरुन उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. प्रकल्प हिताचे असले तरीही पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची पाहणी करा असे निर्देश देखील हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. जे प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. प्रदूषण रोखण्यात कोणताही चालढकल खपवून घेतली जाणार नाही, हयगय करणा-यांनी गंभीर परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवावी अशा कडक शब्दात राज्य सरकारला खडेबोल सुनावलेत. 


 मुंबईत श्वसनाचे आजार वाढले असल्याची सरकारची कबुली 


मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने,  या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याची कबुली दिली.  तसंच मुंबईत बीकेसीमधील प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असल्याची माहितीही आमदारांनी    विचारलेल्या प्रश्नावर सरकारच्या वतीने देण्यात आली.  मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईतील अन्य प्राधिकरणांसह महानगर क्षेत्रातील पालिकांना प्रतिबंधक उपाय करण्याच्या सूचना केल्या होत्या,  मात्र त्याकडे सर्वाचंच दुर्लक्ष झालं. त्यामुळे मुंबईतील श्वसनाचे आजार वाढले असल्याची कबुली सरकारने दिली आहे.


हे ही वाचा :


Air Pollution : सर्दी आणि प्रदूषण दोन्ही त्वचेसाठी घातक; 'या' 5 आजारांना बळी पडण्याचा वाढता धोका