मुंबई : नेहमी लोकलमध्ये धक्के खाणाऱ्या मुंबईकरांना समुद्राच्या खालून धावणाऱ्या रेल्वेमध्ये बसण्याची संधी मिळणार आहे. कारण मुंबई ते अहमदाबाद या नव्या बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या भाईंदरच्या खाडीला पार करण्यासाठी ही ट्रेन चक्क पाण्याखालून जाणार आहे.

 
या मार्गासाठी तब्बल 21 किलोमीटरचा बोगदा बनवला जाणार आहे. त्यामुळे भारतातली पहिली अंडर वॉटर ट्रेन ही मुंबई ते अहमदाबादच्या दरम्यान धावणार आहे.

 
ताशी कमाल 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किलोमीटरचा आहे. जपानची जायका कंपनी या मार्गाचं काम करणार आहे.