तावडेंच्या कारभारापेक्षा आधीचं सरकार बरं होतं. शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हरॅसमेंटची केस दाखल करायला हवी, असं आदित्य ठाकरे म्हणाले. विद्यापीठासोबत MOU झाला होता का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यात आम्हाला पारदर्शकता हवी आहे, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतले इतर मुद्दे :
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात एक डेडलाईन दिली होती ती उलटली. मग आता मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणायचा का?
जर मुंबईबाहेर पडल्यावर मोबाईल नेटवर्क मिळत नसेल, तर शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज कसे भरतील?
सिनेटची निवडणूक लांबली, त्यामागे काय कारणं आहेत, हे कळलं पाहिजे
कुलगुरुंना काढून प्रश्न सुटणार नाहीत, तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
विद्यापीठात IAS / IPS अधिकारी नेमावा ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली
शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हरॅसमेंटची केस दाखल केली पाहिजे, या विषयावर मी पंतप्रधानांची वेळ मगितली आहे.
राज्यमंत्र्यांना किती अधिकार असतो, हे पाहिलं पाहिजे. या खात्यात आम्हाला कॅबिनेट पदाचा दर्जा द्यावा, मग दाखवू कसं काम होतं.