Mumbai Accident : मुंबईतील (Mumbai) वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील (Western Express Highway) वाकोला ब्रिजवर मध्यरात्री मोठी दुर्घटना झाली. टेम्पो आणि बसमध्ये धडक होऊन अपघात (Accident) झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. तर बसच्या चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. महत्त्वाचं म्हणजे या बसमध्ये कॅथे पॅसिफिक (Cathay Pacific) एअरलाईन्सचे कर्मचारी होते, जे ताज लॅण्ड्ल एंड हॉटेलमध्ये जात होते. हे सर्व कर्मचारी परिदेशी नागरिक आहेत.


बसमधील सर्व परदेशी प्रवास सुखरुप


कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी मर्सिडिज बेन्सच्या बसमधून हॉटेल ताज लॅण्ड्स एंडमध्ये जात होते. बस वाकोला ब्रिजवर पोहोचताच टेम्पो आणि बसमध्ये जोरधार धडक झाली. या अपघातात टेम्पो चालकाने जागीच प्राण सोडले तर बसचा चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या अपघातात बसमध्ये असलेल्या एका महिलेच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तसंच बसमधील सर्व कर्मचारी परदेशी नागरिक आहे आणि सर्व जण सुरक्षित आहे. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.


वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी, टेम्पोमधील मासे पडल्याने रस्ता निसरडा


अपघातामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. तर टेम्पोमधून माशांची वाहतूक करण्यात येत होती. अपघातानंतर मासे रस्त्यावर पडले. यामुळे रस्ता देखील निसरडा झाला होता. घटनास्थळावर उपस्थित मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान बसमधील कर्मचाऱ्यांची विचारपूस करत होते. पोलीस सध्या या दुर्घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.






बस चालकाचा शोध सुरु : पोलीस


मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात टेम्प चालकाचा मृत्यू झाला आहे तर बस चालकाने पोबारा केला आहे. बसमध्ये उपस्थित प्रवासी एअरलाईनचे कर्मचारी आहे, सर्व जण परदेशी नागरिक आहे. यापैकी एका महिला प्रवाशाच्या नाकाला दुखापत झाली आहे, तिला उपचारांसाठी व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस एकत्र मिळून काम करत आहेत. तर बस चालकाचा शोध सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.