मुंबई : मुंबईकरांच्या बहुप्रतीक्षित एसी लोकलची चाचणी आजपासून सुरु होणार आहे. कर्जत आणि खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान या एसी लोकलची चाचणी घेतली जाणार आहे.


चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईत दाखल झाली होती. 54 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल सहा महिन्यांपूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र  सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली.

या एसी लोकलसाठी आवश्यक असलेले काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या लोकलचा ट्रायल रन सुरु होणार आहे. ट्रायल रननंतर लवकरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात तरी प्रवास गारेगार होईल, अशी आशा मुंबईकर बाळगून आहेत.