LIVE: सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बँका उघडणार
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 07:21 AM (IST)
1). सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बँका उघडणार, एटीएमसह बँकात गर्दीची शक्यता, 35 दिवसानंतरही सुट्टयांची चणचण कायम 2). वरदा वादळाच्या तडाख्यानं चेन्नईचं जनजीवन विस्कळीत, चौघांचा मृत्यू, शाळा-कॉलेजेसनाही सुट्टी 3). जाळपोळ आणि तोडफोडीनंतर बुलडाण्याच्या मलकापुरमध्ये संचारबंदी, दगडफेकीत आमदार चैनसुख संचेती आणि पोलीस अधीक्षक जखमी 4). नाशकात नोटबदलीच्या संशयावरुन महंत सुधीरदास आणि छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची चौकशी, दोन बॅगा भरुन पैसे मिळाल्याची माहिती 5). मुस्लीम भागातील एटीएममध्ये सरकार मुद्दाम पैसे देत नाही, असदुद्दीन औवेसींचं वादग्रस्त विधान, मोदी सरकारवही बोचरी टीका 6). आजपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेंमेंटला सुरुवात, डिजिटल पेमेंट केल्यास 0.75 टक्क्यांची सूट, कॅशलेस व्यवहारासाठी सरकारचं पाऊल 7). बहुप्रतिक्षित मुंबई एसी लोकलची आज होणार ट्रायल रन, कर्जत ते खोपोलीदरम्यान पहिली चाचणी 8). कल्याणच्या विठ्ठलवाडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 8 मुलांना चावा, पालिकेवर हलगर्जीपणाचा आरोप