मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल आजपासून चर्चगेट ते विरार या मार्गावर धावणार आहे. एसी लोकलच्या दिवसभरात 12 फेऱ्या होणार आहेत.


चर्चगेट ते बोरिवली दरम्यान 25 डिसेंबरपासून एसी लोकलचा शुभारंभ झाला. नववर्षाच्या निमित्ताने या सेवेचा विस्तार विरारपर्यंत होणार आहे. पश्चिम रेल्वेवर सुरु झालेल्या एसी लोकलला प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.

विरारपर्यंत विस्तारित होणाऱ्या लोकलला डहाणू लोकलप्रमाणेच थांबे आहेत. काही फेऱ्या ऐन गर्दीच्या वेळी सुटणार असल्यामुळे त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

एसी लोकलच्या दिवसभरातील 12 फेऱ्यांपैकी 8 फेऱ्या फास्ट, 3 सेमी फास्ट तर 1 फेरी स्लो असणार आहे. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल.

पहिली एसी लोकल धावली, चर्चगेट-मुंबई सेंट्रल 60 रुपये!


भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचं पहिल्या सहा महिन्यांसाठी किमान तिकीट 60 रुपये असून, कमाल भाडं 205 रुपये राहणार आहे. यात जीएसटीचाही समावेश असेल. तसंच या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असेल.

सहा महिन्यानंतर तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. चढ्या दराबद्दल मुंबईकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाताळच्या मुहूर्तावर बहुचर्चित एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक आमदार- खासदार यावेळी उपस्थित होते.

1 जानेवारी 2018 पासून नियमित वेळापत्रक



एसी लोकलचे तिकीटदर