VIDEO : धावत्या ट्रेनखाली उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2016 03:15 PM (IST)
मुंबई : मुंबईच्या घाटकोपर स्टेशनवर एका महिलेने धावत्या लोकल ट्रेनखाली उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटरमनच्या योग्य अंदाजामुळे महिला सुखरुप बचावली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्रमिला पोखनकर असं या महिलेचं नाव आहे. 60 वर्षीय ही महिला घाटकोपरमध्येच राहते. कौटुंबिक वादांना कंटाळल्याने ती आत्महत्या करण्याच्या इराद्यानेच घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आली होती. लोकल ट्रेन येताना दिसताच या महिलेने ट्रॅकवर उडी मारली. या महिलेच्या हालचालींचा अंदाज आल्याने मोटरमनने ट्रेनचा वेग कमी केला. मात्र या घटनेत तिच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. उपचारांसाठी तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाहा व्हिडीओ