मुंबई : तंत्रज्ञानाचा वापर करुन तुमच्या मोबाईलवरुन दुसऱ्याचा नंबर वापरुन कॉल करणं शक्य आहे, असा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. दाऊद कॉलप्रकरणी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी खडसेंनी आज पत्रकारांसमोर प्रात्यक्षिक दाखवलं.


 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईलवरुन मला कॉल आलाच नाही, असा पुनरुच्चार एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यासाठी त्यांनी तज्ज्ञाच्या सहाय्याने प्रात्यक्षिक दाखवलं

 

एकनाथ खडसेंचं प्रात्यक्षिक

यावेळी त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवरुन तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला कॉल केला. पण पत्रकाराच्या मोबाईलवर हा नंबर अंजली दमानियांच्या नावाने डिसप्ले झाला. प्रत्यक्षात अंजली दमानिया किंवा त्यांचा मोबाईल तिथे नसतानाही त्यांच्या मोबाईल नंबरवरुन पत्रकाराला फोन आला. अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करुन हे शक्य असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. तसंच दाऊद कॉल प्रकरणात माझा कोणताही संबंध नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं.


संबंधित बातम्या


दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा


खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन


'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती


पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे


'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'