पोत्यात 2 कट्टे आणि 22 राऊंड्स, दादर स्टेशनवर दोघांना अटक
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 29 Jun 2017 12:15 PM (IST)
मुंबई : मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर 2 कट्टे आणि 22 राऊंडसह दोघांना गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) जवानांनी पकडलं. आरोपी पंजाब मेलमधून बुधवारी सकाळी दादर स्टेशनवर उतरले होते. त्यांनी गव्हाच्या पोत्यात बंदूक आणि राऊंड लपवले होते. पण ते पोतं स्कॅन न करता ते निघून गेले. दोघांवर संशय आल्याने तिथे असलेल्या आरपीएफ जवानाने त्यांना पकडलं आणि पोतं स्कॅन केलं. त्यावेळी त्यात दोन कट्टे आणि 22 राऊंड असल्याचं स्पष्ट झालं. हे कट्टे नेमके कशासाठी आणले होते, याचा तपास दादर रेल्वे पोलिस करत आहेत.