मुंबई: मुंबईतील ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 27 जूनला प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, शिक्षण विभागाकडून दोन दिवस वाढून 29 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जात मुंबईत तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी त्रास झाला होता.
दरम्यान, मुदत वाढवण्यात आली असली तरी पुढील वेळापत्रकात शिक्षण विभागाकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे कला आणि क्रीडा कोट्यातील गुण अपलोड झाले नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ उडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक!
– सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख – 30 जून, संध्याकाळी 5 वाजता
– अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख – 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
* पहिली यादी
– पहिली गुणवत्ता यादी – 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता
– पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत
* दुसरी यादी
– दुसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
– दुसरी गुणवत्ता यादी – 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
– फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता
* तिसरी यादी
– तिसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख – 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
– तिसरी गुणवत्ता यादी – 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
– फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता
* चौथी यादी
– चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
– चौथी गुणवत्ता यादी – 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता
– फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता
कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता
यंदा मुंबईतील पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. तर 10 हजार 157 विद्यार्थ्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यातही 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी यंदाच्या नामांकित कॉलेजची सायन्सची कटऑफ 93 टक्क्यांपर्यंत बंद होण्याचा अंदाज आहे.
अकरावी प्रवेशाबाबत ए टू झेड माहिती
अकरावीच्या उपलब्ध जागा
– अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा – 1 लाख 32 हजार 408
– ऑनलाईन प्रवेश – 1 लाख 59 हजार 682
– एकूण जागा – 2 लाख 92 हजार 90
2016 मधील कट ऑफ
कला : जास्तीत जास्त 94.4% ते कमीत कमी 80%
वाणिज्य : जास्तीत जास्त 94.5 % ते कमीत कमी 89.8%
विज्ञान : जास्तीत जास्त 93.2 % ते कमीत कमी 91%