मुंबई : बोरीवली पश्चिम येथील 'झांसी की राणी' तलावात (Lake) पोहायला गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. येथील झांसी की राणी पार्क बीएमसीच्या (BMC) देखरीतीत आहे, पण तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे, या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. अल्ताफ शेख आपल्या 3 मित्रांसह पोहायला तिथे गेला होता, पाण्यात पोहत आणि मासे पकडत असताना 15 वर्षीय अल्ताफ मोहम्मद शेख बुडाला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला. 

Continues below advertisement

भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी देखील या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. बीएमसी सहाय्यक आयुक्त आणि बीएमसी उपायुक्तांवर तात्काळ एफआयआर नोंदवावा. जोपर्यंत हा तलाव एखाद्या संस्थेकडे देखभालीसाठी होता, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. परंतु, जेव्हा हा तलाव बीएमसीच्या देखरेखीखाली आला आहे, तेव्हापासून कोणतीही देखभाल केली जात नाही. त्यामुळेच, शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला, असे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले. या दुर्घटनेला जबाबदार बीएमसी आर/सेंट्रल आणि डीएमसी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली. तसेच, येथील एमएचबी पोलीस ठाण्यात धरणे आंदोलनावरही ते बसल्याचं दिसून आलं. 

कार अन् बाईकचं मोठं नुकसान

मुंबईच्या बांद्रा पश्चिम पाली हिल रोड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने जात असलेली बाईकने एका कारला जोरदार धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात बाईक चालक गंभीर जखमी झाला, त्यानंतर जखमीला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात मोठी दुखापत झाली नाही. मात्र, कार आणि बाईकचं मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान, अपघाताची घटना कशामुळे घडली, यासंदर्भात बांद्रा पोलीस अधिक तपास करत आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा