मुंबई : परेलच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात (एम. डी. कॉलेज) एमपीएससीच्या परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अवघा काही मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांना परीक्षेला बसू न देण्याचा प्रकार समोर आला आहे. आज सकळी 10 वाजता ही परीक्षा सुरु होणार होती.

परीक्ष केंद्रावर परीक्षेसाठी 9.30 वाजता हजर राहण्याची वेळी होती. मात्र अगदी 9.30 च्या ठोक्याला कॉलेज प्रशासनानं कॉलेजचा गेट बंद केला. परीक्षेला 20 मिनिट वेळ असताना देखील विद्यार्थ्यांना आत सोडलं नाही. काही विद्यार्थ्यांना तर अगदी एक ते दोन मिनिट उशीर झाला होता. मात्र तरीही त्यांना आत सोडण्यात नाही आलं.

एमडी कॉलेज प्रशासनाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षेला बसू न दिल्याने त्यांचं वर्षभराचं कष्ट, मेहनत वाया गेली आहे. केंद्र प्रमुखांच्या मुजोरीमुळे तब्बल 10 ते 12 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. नवी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या इतर भागातून तर काही विद्यार्थ्यी दिल्लीहून या परीक्षेसाठी आले होते.

आज रविवार मेगाब्लॉक तसेच गुर्जर आंदोलन सुरु असल्याने दिल्लीहून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीराने मुंबईत पोहचल्या. मात्र, याचा कोणताही विचार न करता आपल्या नियमानुसार 9.30 वाजताच्या पुढे कोणत्याही विद्यार्थ्याला आत प्रवेश मिळाला नाही.

एमपीएससी परीक्षा सचिवांना याबाबत विचारणा केली असता सहानभूती दाखवून या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याला विद्यार्थीच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.