मुंबई : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद देण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आज बैठक असून, या बैठकीत राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याबाबत ठराव मंजूर होणार असल्याची माहिती मिळते आहे.
मुंबईत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक आहे. या बैठकीत राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्याबाबत ठराव मंजूर केला जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठरावही याच बैठकीत मंजूर होणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याबाबत चर्चा सुरु आहेत. काँग्रेसमधीलच अनेक वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्या दिशेने कोणतीही पावलं पडताना दिसत नव्हती.
अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ठरवाच्या रुपाने राहुल गांधींना अध्यक्ष करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल.
राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2017 07:19 PM (IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याबाबत चर्चा सुरु आहेत. काँग्रेसमधीलच अनेक वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्या दिशेने कोणतीही पावलं पडताना दिसत नव्हती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -