मुंबई : ‘आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल.’ अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाकेबंदीबाबत दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते.


फटाकेबंदीच्या निर्णयानंतर अनेक स्तरातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केला असल्यानं आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चिंता नसावी, फटाकेबंदी करणार नाही: रामदास कदम

संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करु नये, हिंदूंच्या सणाची काळजी या रामदास कदमला आहे, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी काल (मंगळवार) विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली होती. यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. महाराष्ट्रातही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, यासाठी प्रयत्न करु, असं रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी टीकाही केली होती.

आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निर्बंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना आणि मी करणार नाही. त्यामुळे फटाकेबंदीबाबत असा निर्णय घेणार नाही, असंही रामदास कदम म्हणाले.

संबंधित बातम्या :

चिंता नसावी, फटाकेबंदी करणार नाही: रामदास कदम

निवासी भागात फटाकेविक्रीला बंदी, हायकोर्टाचे सरकारला आदेश

फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे

फटाकेबंदीवरुन शिवसेनेतच जुंपली, संजय राऊतांचा फटाकेबंदीला विरोध