मुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉयफ्रेण्डसोबत ब्रेकअप झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजतं. घटनास्थाळी त्यांची सुसाईड नोटसुद्धा सापडली आहे. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या.
चेतना पंडित गोरेगावमधील पद्मावतीनगर अपार्टमेंटमध्ये आपल्या चार मैत्रिणींसह राहत होत्या. सोमवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या 27 वर्षांच्या होत्या.
चेतना यांच्या मैत्रिणी घरी परतल्या तेव्हा घराचा दरवाजा उघडत नव्हता. त्यांनी चेतना यांच्या मोबाईलवर कॉल केला परंतु त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. अखेरीस त्यांनी चावीवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता चेतना यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आले.
चेतना यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये “माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावाची माफीही मागितली.” त्यांच्या मागे त्यांचा एकुलता एक भाऊ आहे.
चेतना पंडित यांनी ‘धूम 3’ चित्रपटात कतरिना कैफला बाईक रायडिंग शिकवली होती. तसेच त्यानी अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्रींना बाईक चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते.
कतरिना-अनुष्काला बाईक शिकवणाऱ्या चेतना पंडित यांची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 12:08 PM (IST)
चेतना पंडित गोरेगावमधील पद्मावतीनगर अपार्टमेंटमध्ये आपल्या चार मैत्रिणींसह राहत होत्या. सोमवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या 27 वर्षांच्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -