मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 10:27 AM (IST)
मुंबई : मुलाच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्याने आईने आपल्याच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या चेंबूरमध्ये समोर आला आहे. सावित्री दोरणाली असं या महिलेचं नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. काही वर्षांपूर्वी सावित्रीच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, यानंतर सावित्री आपल्या तीन मुलांसह या भागात राहत होती. यातील दोघांचा आजारादरम्यान मृत्यू झाला. सावित्रीच्या सहा वर्षांच्या मुलाला मिरगीचा त्रास होता. त्याच्या उपचारासाठी गेले काही महिने सावित्रीला मोठ्या प्रमाणात खर्च येत होता. अत्यंत कमी पगारात काम करणाऱ्या सावित्रीला आपल्या मुलावरच्या उपचारांचा खर्च झेपत नव्हता, म्हणून अखेर परिस्थितीला कंटाळून सावित्रीने ओढणीने गळा दाबून आपल्याच मुलाची हत्या केली.