मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट !
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 07:28 AM (IST)
मुंबई : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाघाचा फायबरचा पुतळा भेट दिला. मुनगंटीवार यांनी 'मातोश्री'वर जाऊन हा पुतळा भेट दिला. वनमंत्रालयाने 1 जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मात्र सध्याचं वातावरण पाहाता, दोन्ही एकमेकांचे प्रचंड विरोधक असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळे सेना-भाजपचा तणाव कमी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.