डोंबिवलीला राहणाऱ्या 35 वर्षीय आशा मॅथ्यू दहा महिन्यांच्या लेकीसोबत माहेरी निघाल्या होत्या. आशा यांच्या खांद्यावरील बॅगेचा पट्टा शेजारुन जाणाऱ्या बाईकमध्ये अडकला आणि त्यांचा तोल गेला. आशा काही मीटरपर्यंत फरपटत गेल्या, तर त्यांच्या कडेवर असलेली इस्थर डोळ्यादेखतच रिक्षाखाली आली.
बाईकचालक आणि पादचाऱ्यांनी तात्काळ मायलेकीला रुग्णालयात दाखल केलं. इस्थरचा फुल बॉडी सीटी स्कॅन केल्यावर तिच्या छातीत हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर चिमुरडीला कुटुंबीयांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हलवलं.
इस्थरला पेडिअॅट्रिक आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी पेनकिलर्स दिल्या. सुदैवाने दोन आठवड्यांनंतर इस्थरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.