माझ्याकडून घडलेल्या अपघाताविषयी दिलगीर : आदित्य नारायण
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2018 12:44 PM (IST)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा, गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने सोमवारी बेदरकारपणे गाडी चालवून रिक्षाला धडक दिली होती
मुंबई : प्रसिद्ध गायक आदित्य नारायण याने आपल्याकडून घडलेल्या अपघाताविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. अंधेरीतील लोखंडवाला भागात आदित्यने बेदरकारपणे मर्सिडीज कार चालवून रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये वृद्ध चालकासह महिला जखमी झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा 30 वर्षीय मुलगा, गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने सोमवारी बेदरकारपणे गाडी चालवून रिक्षाला धडक दिली होती. अपघातानंतर आदित्यला अटक झाली, मात्र 10 हजारांच्या पर्सनल बाँडवर त्याला जामीन मिळाला. 'हा एक दुर्दैवी प्रकार होता. जे काही झालं त्याबद्दल मला खेद आहे. अपघातानंतर मी लगेच रिक्षाचालक आणि महिला प्रवाशाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं.' असं आदित्यने स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे. दोन्ही जखमींचा सर्व वैद्यकीय उचलण्याचं आश्वासन आदित्यने दिलं आहे.