नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 674 झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना संसर्गाचा वेग हा कमालीचा वाढलेला दिसून येत आहे. सध्या वाढत असलेली कोरोना पॉझिटिव्ह संख्या ही एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगारांमुळे वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.
वाशी एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. एपीएमसीमधील रूग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त होत त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील एक आठवडा एपीएमसी मधील भाजीपाला, कांदा, बटाटा, फळं, मसाला, दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशी 18 ते 20 हजार जणांची स्किनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केटमध्ये प्रवेश बंदी केली जावून त्यांचे कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत.
जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी वाशी येथील एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजी , फळ, कांदा बटाटा, मसाला, दाना मार्केट 11 ते 17 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.
मार्केट बंद राहिल्यानं मुंबईत येणाऱ्या मालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 11 ते 17 मे या कालावधीत माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. कोकण आयुक्त, नवी मुंबई मनपा आयुक्त, पोलिस, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांची 8 मे रोजी बैठक झाली होती, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली आहे. एपीएमसी मधील रुग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली असून यासाठी सर्व स्तरातून रोष व्यक्त होत आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्रव्यवहार करून एपीएमसीमुळे कम्युनिटी संसर्ग पसरण्याची भिती असल्याने त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार , व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशा 18 ते 20 हजार जणांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केट मध्ये प्रवेश बंदी केली जाणार असून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
Vashi APMC मुळे 200 हून अधिकांना कोरोना संसर्ग, आजपासून एक आठवडा एपीएमसी बंद
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
11 May 2020 09:12 AM (IST)
Vashi APMCमधील रूग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त करत त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती.
यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील एक आठवडा एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -