Mumbai Air Quality Index: गेल्या काही दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात दमदार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे उष्णतेने त्रस्त असलेल्याना तर दिलासा मिळालाच यासोबतच महाराष्ट्रातील अनेक धरणे आणि तलाव देखील भरले आहेत. यामुळे मुंबईसह अनेक जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यामध्येच आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वरून राजाच्या कृपने मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली आहे. अशी माहिती सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या (SAFAR) अहवालातून समोर आली आहे. गेल्या तीन वर्षात यावर्षी मुंबईची हवेची गुणवत्ता सर्वात स्वच्छ राहिली असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनमुळे मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारली आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच मुंबईतील हवा गुणवत्ता इतक्या चांगल्या स्थितीत आहे. जून आणि जुलैतील हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 50 च्या खाली राहिली आहे. शुक्रवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी पुणे, दिल्लीपेक्षा चांगली होती.
मुंबईत जूनपासून दररोज 10 ते 35 दरम्यान हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पातळी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईचा एक्यूआय 36, पुण्याचा 58 तर अहमदाबादचा 50 आणि दिल्लीचा 55 होता. आज देखील मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 42 वर, म्हणजे उत्तम आणि समाधानकारक स्थितीत आहे. पुढील आणखी काही दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी चांगली राहण्याचा सफरचा अंदाज आहे. मुंबईचा एक्यूआय 14 जून रोजी 28 आणि 2 जुलै रोजी 10 होता, जो आत्तापर्यंतचा सर्वोत्तम आहे. सफरच्या नोंदीनुसार, मुंबईने शेवटच्या वेळी 4 सप्टेंबर 2019 रोजी 12 एक्यूआय ही सर्वोत्तम हवेची गुणवत्ता नोंदवली होती.
आजची हवेची गुणवत्ता पातळी :
- भांडुप: 39 (उत्तम)
- कुलाबा: 18 (उत्तम)
- मालाड: 25 (उत्तम)
- माझगाव: 30 (उत्तम)
- वरळी: 38 (उत्तम)
- बोरिवली: 48 (उत्तम)
- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स
: 38 (उत्तम) - चेंबूर: 39 (उत्तम)
- अंधेरी: 68 (समाधानकारक)
- नवी मुंबई: 76 (समाधानकारक)
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: औरंगाबादच्या शिवसेनेच्या लोकसभा जागेवर 'भाजप'चा दावा
Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना शपथविधीचाच विसर पडला? सुधीरभाऊंचा कॅबिनेट मंत्री उल्लेख असलेल्या फलकाचे केलं अनावरण!