कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2017 06:51 PM (IST)
मोजोज ब्रिस्टो हे रेस्टॉरंट प्रख्यात गायक शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन, युग पाठक, युग तुली आणि प्रणिता श्रेष्ठा यांच्या मालकीचं आहे.
मुंबई : कॅफे मोजोज.. हे मुंबईतल्या तरुणाईचं हॉट फेव्हरेट डेस्टिनेशन होतं. कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याआधी वन अबव्ह आणि मोजोजचा प्रचंड थाट होता. डीजेच्या दणदणाटात आणि मंद प्रकाशातला डान्स ही वन अबव्हची ओळख. तर बार काऊंटरवर बार टेंडर आग लावून आगीशी खेळण्याचा स्टंट ही या मोजोजची खासियत होती. मोजोज ब्रिस्टो हे रेस्टॉरंट प्रख्यात गायक शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन, युग पाठक, युग तुली आणि प्रणिता श्रेष्ठा यांच्या मालकीचं आहे. बसण्यासाठी प्रशस्त जागा, पदार्थांची बक्कळ व्हरायटी आणि दारुचे अनंत प्रकार. या मुळे कॅफे मोजोज कायम गजबजलेलं असायचं. कमला ट्रेड हाऊस या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर वन अबव्ह हे हॉटेल होतं. त्याच्यावर रुफ टॉपवर कॅफे मोजोज होता. वन अबव्ह हे हॉटेल सी ग्रेड हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीच्या मालकीचं होतं. कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानका हे तिघे या कंपनीचे संचालक आहेत. तर मोजोज ब्रिस्टो हे प्रख्यात गायक शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन, युग पाठक, युग तुली आणि प्रणिता श्रेष्ठा यांच्या मालकीचं आहे. विशेष म्हणजे वन अबव्ह रेस्टॉरंट्समध्ये दारु मिळत असली, तरी हे हॉटेल पूर्णपणे शाकाहारी होतं. त्यामुळेच शाकाहारी समजल्या जाणाऱ्या गुजराती, जैन अशा समाजातल्या मुलांची इथं जास्त गर्दी असायची. त्यामुळेच मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये याच समाजाच्या मुलांची संख्या जास्त आहे. काय आहे प्रकरण? हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. संबंधित बातम्या : मुंबईतील लोंढे आवरा: हेमा मालिनी ‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’ हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित 1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील कमला मिल्स आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! कमला मिल्स आग : आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ