मुंबई : लालबाग राजाच्या मिरवणुकीला काही समाजकंटकांकडून गालबोट लागलं आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या पाकिटांवर, मोबाईल्सवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांकडे तक्रारी करण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


लालबागच्या राजाचं दर्शन न घेता आलेले भाविक दर्शनासाठी विसर्जन मिरवणुकीत बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर दाखल होतात. याचा गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे.


चोरट्यांना अनेक भाविकांचे मोबाईल, पाकीट लंपास केले आहेत. त्यामुळे चोरी झालेल्या भक्तांनी चोरीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. मात्र चोरीची तक्रार करण्यासाठी मोठी गर्दी पोलीस स्टेशन बाहेर लागली आहे. त्यामुळे तक्रारीसाठीही भाविकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागत आहे.


त्यामुळे विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर चोरीचं संकट ओढावलं आहे.