Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधील 4500 मतदारांनी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केले आहे. प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर आणि गजानन पुडलिक भोईर अशी काही त्यामधील नावे असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुक आयोगाच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. राज ठाकरे यांनी सत्याचा मोर्चात थेट पुरावा सादर करत आयोगावर हल्लाबोल केला. गेल्या पाच वर्षात निवडणुका झाल्या नाहीत आणि वर्षभर निवडणुका नाही झाल्या, तरी काय फरक पडतो? अशी विचारणा करत त्यांनी मतदारयाद्यांवर काम करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचे आकडे आणि पुरावे सादर केले आणि सांगितले की, असे लाखो लोक आहेत जे महाराष्ट्रभर या मतदानासाठी म्हणून वापरले गेले.

Continues below advertisement

दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे

राज यांनी भविष्यात जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा कार्यकर्त्यांनी काय करावे, याबद्दल त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. ते म्हणाले की, पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवर जोरात काम करा. हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे, त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत आणि महाराष्ट्रात चाललेला कारभार वटणीवरती येणार नाही, असे ते म्हणाले. राज यांनी 1 जुलैपर्यंतच्या यादीनुसार विविध लोकसभा मतदारसंघांमधील दुबार मतदारांचे आकडे वाचून दाखवले. इतके पुरावे दिल्यानंतरही जानेवारीत निवडणुका घेण्याचा हट्ट सुरू आहे, यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, "एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे. नाही कोर्टाने सांगितलं, जानेवारीत निवडणुका घ्या, का घ्या? पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत. अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? असे ते म्हणाले. 

ते म्हणाले की, जी माणसं भरली आहेत, त्यांचं काय करायचं मग? त्यांच्यातल्या त्यांच्यात निवडणुका आटोपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात? अशाने लोकशाही तरी टिकेल? असे ते म्हणाले. एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20 हज मतं बाहेरून आतमध्ये आणली. नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत. कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला, कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट देशभर सुरु असल्याचे ते म्हणाले.राज यांनी ईव्हीएम मशीनबद्दल (EVMs) बोलताना त्यांनी 2017 पासूनच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, निवडून आलेले चिमटे काढून बघत होते, मी कसा आलो निवडून, पण निवडून आलेल्यांची सोय अगोदरच झाली होती. हे सगळे कारस्थान आयोगामार्फत सुरु आहे. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या