हेडलाईन्स
1. वाहन चालकांना खूश खबर.. पेट्रोलचे डिझेलचे दर घसरले पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, वाहन चालकांची चंगळ
---------------------------------
2. बलुचिस्तानच्या उल्लेखानंतर पाकिस्तान चवताळला, भारत रॉच्या माध्यमातून दहशतवाद पसरवत असल्याचा कांगावा, तर काश्मीरप्रश्नी चर्चेचं निमंत्रण
---------------------
3. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला दहशतवादी हल्ल्याचं गालबोट, श्रीनगरमधील हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर शहीद तर 6 जवान जखमी, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
--------------------------
4. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर, साताऱ्यातील वेळू अव्वल, खापरटोन आणि जायगाव दुसऱ्या स्थानावर, विजेत्यांना मुख्यमंत्री निधीतून मोठी रक्कम
-----------------------------
5. साताऱ्यातल्या डॉ. संतोष पोळची सहा हत्यांची कबुली, मंगला जेधे हत्या प्रकरणातला सर्वात मोठा गौप्यस्फोट, फार्महाऊस ठरला सर्व हत्यांचा साक्षीदार
------------------------------
6. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर मुख्यालयाचं उद्घाटन, राज्यात नव्या ४४ सायबर लॅब, ऑक्टोबरपर्यंत मुंबई सीसीटीव्हीनं जोडणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
-------------------------------
7. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची झोळी अजूनही रिकामीच, बॉक्सर विकास क्रिशनचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात, तर साताऱ्याची ललिता बाबर स्टीपलचेस शर्यतीत दहावी
-----------------------------
8. भारताला बॅडमिंटनपटूंकडून आता पदकांची अपेक्षा, पी.व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक
------------------------------------------
एबीपी माझा वेब टीम