मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी खोपकर यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये क्रिकेट खेळल्याप्रकरणी खोपकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. मनपाच्या तक्रारीनंतर अमेय खोपकर यांना अटक करण्यात आली आहे.