भिवंडीत पुन्हा एक इमारत कोसळली, दोन जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 08:56 AM (IST)
भिवंडीः भिवंडीत इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू होऊन 24 तास उलटत नाहीत, तोवरच आणखी एका इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. नवा बाजार परिसरातील इमारतीचा स्लॅब आज सकाळी कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघाताची तीव्रता कमी असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्रकारानंतर पालिका प्रशासनाने त्वरित इमारतीच्या पाडकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीतील हनुमान टेकडी नावाची दुमजली इमारत काल सकाळी कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेने ही इमारत अगोदरच धोकादायक म्हणून घोषित केली होती.