हब मॉल ते आरे फ्लायओव्हर, पठाणवाडी ते पुष्पा पार्क आणि मेट्रो मॉल ते देवीपाडा अशा तीन विभागात या प्रकल्पाचं काम करण्यात येणार आहे. पुढील 10 ते 12 दिवस हे बॅरिकेडींगचं काम सुरु राहणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकांचं सहकार्य मिळाल्यास वेळेतच हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी प्रशासनाला आशा आहे. मुंबईकरांची वेळ आणि इंधन वाचवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.
मेट्रो 7 प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
- मेट्रो 7 प्रकल्प 5 किमी लांबीचा असून, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर मेट्रो धावेल
- 16 स्थानकांचे बांधकाम 3 टप्प्यांमध्ये होईल
- तीन कंत्राटदार मिळून 16 स्थानकांचे बांधकाम करतील
- 5 किमी लांबीचा उन्नत मार्ग 30 महिन्यांत बांधून पूर्ण करणार
या तीन कंपन्या मेट्रो 7 चं बांधकाम करणार :
- पहिल्या टप्प्यात अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद आणि नवे अशोक नगर या पाच स्थानंकांचे बांधकाम करण्यासाठी मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेडची शिफारस
- आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पापार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अँन्ड महिंद्रा या दुसऱ्या टप्प्यातील 6 स्थानंकांच्या बांधकामासाठी मे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमीटेडची शिफारस
- मागाठाणे, देवीपाडा, नॅशनलपार्क, ओवरी पाडी, दहिसर पूर्व या 5 स्थानकांच्या बांधकामासाठी मे. एन.सी.सी लिमीटेडची शिफारस