औरंगाबाद : विनायक मेटे आणि मराठा मोर्चाचा संबंध नाही, श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास योग्य उत्तर देऊ, 12 मराठा संघटनांचा पत्रकार परिषदेत इशारा


---------------------

मुंबईः डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजजवळ 20 वर्षीय मुलीवर वार करून पर्स पळवली, टिळक नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

---------------------

हेडलाईन्स

अहमदनगर-औरंगाबाद रोडवर ईमामपूर घाटात बाईकवरुन आलेल्या इसमांचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, पोलिस घटनास्थळी दाखल

-------------------

मुंबईत विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषद मनसेचा गोंधळ, अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद बंद पाडली

---------------------

जे प्रतिमोर्चात सामील होतील त्यांनी लक्षात ठेवावं की ते दलितांच्या हितासाठी नव्हे तर संघाचे हस्तक म्हणून काम करतायत- प्रकाश आंबेडकर

---------------------

1 कपिलपाठोपाठ इरफान खानचंही मुंबईत अनधिकृत बांधकाम, कपिल आणि इरफान खानवर गुन्हा दाखल, कपिल शर्माविरोधात भाजपचं आंदोलन

---------------------

2 कावेरीचं पाणी तामिळनाडूला सोडण्यावरुन कर्नाटक पेटलं, तामिळी गाड्यांची तोडफोड करत चालकांना मारहाण, बंगळुरुमध्ये जमावबंदी

---------------------

3 मुकेश अंबानींच्या रिलायन्सनं एमएमआरडीएचे दीड हजार कोटी थकवले, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींचा दावा, व्याजासह थकीत रक्कम वसूल करण्याची मागणी

--------------

4 राजकारणामुळे राम मंदिर रखडलं, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा, अयोध्येतील राम मंदिरासाठी संघ आक्रमक

-------------

5 स्थानिक भाषा शाळेत शिकवण्याच्या वेलिंगकरांच्या भूमिकेला नव्या संघचालकांचा पाठिंबा, भाजपसाठी नवी अडचण, गोव्यात राजकीय वाद चिघळण्याची शक्यता

-------------

6 गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस, पर्लकोटा, पामुलगौतम नद्या दुथडी भरुन, खासगी गाड्यांची पुलावरुन धोकादायक वाहतूक

---------------

7 लालबागच्या राजाचरणी 7 दिवसात कोट्यवधीचं दान, तर राज ठाकरेंनी घेतलं नाना पाटेकरांच्या गणपतीचं दर्शन

------------------

8 बकरी ईदच्या सणाचा आज देशभर उत्साह.. मुंबईच्या मिनारा मशिदला आकर्षक सजावट, तर कानपूरमध्ये 140 किलोच्या बोकडाला 21 लाखांची बोली

--------------------

एबीपी माझा वेब टीम