मुंबई: काँग्रेस विशेषत: संजय निरुपम आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळताना दिसत आहे. कारण मनसेनं काल काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर, आज मध्यरात्री काही अज्ञातांनी वांद्रेमधील काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली.


तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेनं परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख असलेला भलामोठा फ्लेक्स उभारला आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी खुद्द भाजपनंच फूस लावल्यानं मनसेनं हा राडा केल्याचा आरोप केला आहे.

संदीप देशपांडेंना अटक

दरम्यान, कालच्या तोडफोडीनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांना पोलिसांनी अटक केली. याशिवाय अन्य कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.

या सर्वांवर दंगल, ट्रेसपासिंग, नुकसान आणि नासधूस या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आज या सर्वांना कोर्टात हजर केलं जाईल.

काँग्रेसची घोषणाबाजी

दरम्यान हल्ल्यामुळे संतापलेल्या काँग्रेसनं मनसेच्या झेंड्याची आणि राज ठाकरेंच्या प्रतिमांची होळी केली. तसंच राज ठाकरेंच्या फोटोसमोर बांगड्या धरत मनसेचा निषेध केला.

मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची शुक्रवारी सकाळीच नासधूस करण्यात आली. मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी केलं.

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे

आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या.

संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.  पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.

संबंधित बातम्या

काँग्रेस कार्यालय तोडफोड: संदीप देशपांडेंना अटक

मनसेच्या भित्र्या, नपुंसक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे 

मनसेच्या भित्र्या, नपुसंक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम